छत्रपतींचा आदर्श डोळयासमोर ठेवून राज्य करणारे राज्यकर्ते हवे आहेत !
कवी भूषण हे शिवाजी महाराजांबरोबर राहिलेले कवी, ज्यांनी महाराजांचे आयुष्य व त्यांनी केलेली युद्धे फार जवळून पाहिली. आज शिवजयंती आहे. कवी भूषण यांच्या दृष्टीकोनातून छत्रपती शिवाजी महाराज कसे होते व त्यांनी लिहिलेल्या शिवाबावनीची आज देशाला कशी आवश्यकता आहे, हे आज आपण पाहूया.
लेखक : श्री. प्रसाद करकरे, दादर, मुंबई.
प्रभु श्रीराम, प्रभु श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील साम्य
कवी भूषण यांनी वेगवेगळया छंदांमध्ये शिवरायांवर काव्यरचना केल्या.
दशरथजू के राम भये, वसुदेव के गोपाल,
सो ही प्रकटे साही के सिवराज भूपाल ।।
वरील दोह्यातून कवी भूषण सांगत आहेत की, दशरथाच्या घरी जसे प्रभु श्रीराम जन्मले, वसुदेवाच्या घरी जसे प्रभु श्रीकृष्ण, तसेच शहाजी राजांच्या घरी या भूमीचे पालनहार असे शिवराय प्रकटले.
या त्यांच्या एका काव्यातून कवी प्रभु श्रीराम, प्रभु श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील साम्य सांगत आहत की, तिघांनीही असुरी शक्तींशी लढून धर्माचे राज्य पृथ्वीवर पुन्हा स्थापन केले.
छत्रपती शिवाजी महाराज नसते,
तर हिंदुस्थानचे इस्लामीकरण झाले असते !
कुंभकन्न असूर अवतारी औरंगजेब,
किन्ही कत्ल मथुरा दोहाई फिरे रब की,
खोदी डारे देवी सहर मोहल्ला बाके लाखन तुरुक कीन्हे छूटी गयी तबकी,
भूषन भनत भाग्यो काशीपती विश्वनाथ,
और कौन गिनती मे भूली गती भव की,
चारो वर्ण धर्म छोडी, कलमा निवाजी पढी,
सिवाजी न होतो, तो सुन्नत होती सबकी !!!
वरील छंदातून कवी भूषण शिवाजी महाराजांच्या काळची परिस्थिती वर्णन करतांना सांगतात की, सर्वत्र दहशतीचे साम्राज्य होते. ठिकठिकाणची देवळे आणि देव उद्ध्वस्त केले जात होते. मोगल सैनिक सगळीकडे इस्लामचे निशाण मिरवत होते, धर्मांतरास नकार देणार्या हिंदूंच्या घरादारांवरून नांगर फिरवला जाई. काशी, मथुरा इत्यादी अनेक पवित्र ठिकाणे उद्ध्वस्त करून तिथे मशिदी उभारण्यात आल्या होत्या. आणि त्याच सुमारास शिवाजी महाराजांसारख्या स्वातंत्र्यसूर्याचा जन्म झाला. कवी भूषण म्हणतात की, जर शिवाजी महाराज नसते तर हे असेच भयोत्पादनाचे साम्राज्य सर्वदूर पसरले असते, सर्व हिंदूंची सुन्ता झाली असती आणि हिंदुस्थानचे इस्लामीकरण झाले असते.
हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी शिवाबावनीचे नित्य पठण आवश्यक !
कवी भूषणाने वेगवेगळया प्रकारच्या अशा जवळपास ३०० काव्यरचना छ. शिवाजी महाराजांवर केल्या आणि त्यातूनच बावन्न ठळक अशा रचना एकत्र करून त्यांना `शिवाबावनी’ असे नाव देण्यात आले; परंतु त्यातील मोगलांच्या जुलमांच्या वर्णनाने मुसलमानांच्या भावना दुखावतात, या कारणास्तव मुसलमानांचे लांगूलचालन करणार्या काँग्रेस शासनाने, मुख्यत्वे गांधींनी त्यावर बंदी घातली. अवघे जग ग्रासायला निघालेला इस्लामी भयोत्पादन पहाता, शिवाबावनीचे नित्य पठण आणि त्यातून बोध घेऊन शिवाजी महाराजांचे हिंदुराष्ट्र आणि रामराज्याच्या निर्मितीचे ध्येय आपण उराशी बाळगणे आवश्यक आहे.
पब संस्कृती शिवाजी महाराज नव्हेत, तर सलमान व संजय दत्त जन्माला घालतील, हे लक्षात घ्या !
छत्रपतींचे चरित्र हे नियमित डोळयांसमोर ठेवून राज्य करतील, असे राज्यकर्ते आज भारताला हवे आहेत. तेव्हा शिवजयंती तारखेनुसार कि तिथीनुसार याचा वाद न घालता, ती वर्षातून बारा वेळा साजरी झाली तरी चालेल, परंतु शिवचरित्रातून योग्य तो बोध घेणे आवश्यक आहे. आजही अंतर्गत आणि सीमेवरील भयोत्पादनाचा बीमोड करण्यासाठी आपल्याला एका शिवाजीची गरज आहे. परंतु एक शिवबा निर्माण करायला एक जिजाऊसुद्धा आवश्यक असते, ती कुठे आहे ? पब संस्कृतीच्या जनमान्यतेसाठी लढा देणार्या, पबविरोधी श्री. मुतालिक यांना गुलाबी अंतवस्त्रे पाठवण्यातच धन्यता मानणार्या जिजाऊ होऊच शकत नाहीत आणि फोफावणारी पब संस्कृती फक्त सलमान, संजय दत्त यांसारखे व्यसनी घडवू शकते. काय स्वीकारायचे आणि कशाला विरोध करायचा, हे सुजाण नागरिकांनी स्वत:च ठरवायचे आहे !
जय भवानी ! जय शिवाजी !!