रेस्टन, ८ मार्च (वार्ता.) – येथील `सलाम नमस्ते’ या नभोवाणीवरील `नमस्ते’ या कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीचे धर्मसंघटक डॉ. दुर्गेश सामंत यांची `कॉन्फरन्स’ सुविधेद्वारे मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये अमेरिकेतील `सनातन धर्म फाऊंडेशन’ या हिंदुत्ववादी संघटनेच्या दूरदर्शनवरील कार्यक्रमांच्या आयोजनाचे प्रमुख डॉ. कृष्णा पुत्तपार्थी, `सनातन धर्म फाऊंडेशन’चे कार्यकर्ते
श्री. राजेश चेरूकुपल्ली व `फोरम फॉर हिंदु अवेकनिंग’ या संकेतस्थळाच्या सल्लागार सौ. भावना शिंदे हे मान्यवर सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन `सनातन धर्म फाऊंडेशन’चे व्यवस्थापक श्री. गोपाल पोनानगी यांनी केले. डॉ. सामंत यांनी या मुलाखतीमध्ये हिंदु संघटन, धर्मावरील आघात व धर्मशिक्षण आधी विविध पैलंूवर माहिती सांगितली. त्यांची मुलाखत अमेरिकेतील हिंदूंना धर्मपालन करण्यास उद्युक्त करणारी होती. `सनातन धर्म फाऊंडेशन’ या संघटनेने २००७ साली `सलाम नमस्ते’ या नभोवाणीवर दर शनिवारी सकाळी ७ ते ९ या कालावधीमध्ये `सनातन धर्म’ या विषयावर `नमस्ते’ हा कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात केली.
या कार्यक्रमामध्ये स्थानिक संघटना, प्रतिष्ठित व्यक्ती व जगभरातील हिंदुत्ववादी नेते यांच्या मुलाखती घेतल्या जातात. `नमस्ते’ या कार्यक्रमामध्ये डॉ. सामंत यांनी भारतात हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्याची माहिती दिली. भारतात हिंदु जनजागृती समितीच्या मार्फत घेण्यात येणार्या सभा, सभांमुळे हिंदूंमध्ये होत असलेली जागृती, समितीमार्फत प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने `राष्ट्रध्वजाचा अवमान टाळा’ अभियान व वॅलेंटाइन डे’च्या विरोधात राबवलेले अभियान, श्री शंकरा या वाहिनीच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समिती करत असलेला धर्मप्रसार यांबद्दल माहिती दिली. इतिहासाचे विकृतीकरण करून पाठ्यपुस्तकांमध्ये खोटी माहिती प्रसारित करणार्या एन्.सी.ई.आर्.टी.च्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने हाती घेतलेले अभियान, गोव्यामध्ये या अभियानाला मिळालेले यश याबद्दलही कार्यक्रमात सविस्तर माहिती देण्यात आली. १० मार्चला होळी आहे. त्या निमित्ताने होळीच्या कालावधीत काय करावे व काय करू नये, याबद्दल माहिती दिली. या कायक्रमामध्ये सौ. भावना शिंदे यांनी `फोरम फॉर हिंदु अवेकनिंग’ या संकेतस्थळाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणारे व `सनातन धर्म फाऊंडेशन’चे व्यवस्थापक श्री. गोपाल पोनानगी यांनी डिसेंबर २००८ मध्ये डॉ. सामंत यांची एका कार्यक्रमाच्या अंतर्गत मुलाखत घेतली होती.
अमेरिकेतील हिंदु संघटन दिनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित रहाण्याचे हिंदु जनजागृती समितीला निमंत्रण
अमेरिकेत `सनातन धर्म फाऊंडेशन’च्या वतीने हिंदु संघटन दिवस साजरा करण्यात येणार आहे. या वेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले डॉ. कृष्णा पुत्तपार्थी यांनी डॉ. सामंत यांना या कायक्रमामध्ये उपस्थित रहाण्याचे निमंत्रण दिले. `या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचा प्रनिनिधी उपस्थित राहील’, असे डॉ. सामंत यांनी मुलाखतीच्या वेळी सांगितले.
जिज्ञासूंना डॉ. सामंत यांनी दिलेली मुलाखत सविस्तरपणे ऐकण्यासाठी
‘ h t t p : / / w w w . s a n a t a n a d h a r m a f o u n d a t i o n . c o m /
या लिंकवर मुलाखतीचे ध्वनीमुद्रण उपलब्ध आहे.