हिंदूंच्या रक्‍ताने बरबटलेला काँग्रेसचा हात !

या लोकसभा निवडणुकीत मते मागायला काँग्रेसचे इच्छुक दारात आले, तर “दिलेली वचने पाळायची तुम्हाला सवय आहे का ?”, असा प्रश्‍न त्यांना विचारला पाहिजे; कारण सध्या मोठ्या प्रमाणावर पेशावरमधून हिंदूंची कुटुंबेच्या कुटुंबे भारतात आश्रयाला पळून येत आहेत. तालिबानने अफगाणिस्तानच्या राज्यकारभारावर पकड बसवून तेथे शरीयतचे निर्बंध लागू केले. आता त्यांनी पाकिस्तानकडे लक्ष वळविले आहे. पेशावरमध्ये शरीयतप्रमाणे सर्व व्यवहार झाले पाहिजेत, असे आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश हिंदूंनाही लागू आहेत. हिंदु पुरुषांनी दाढी वाढवली पाहिजे आणि हिंदु स्त्रियांनी बुरखा घालूनच वावरले पाहिजे, अशी तालिबानी आज्ञा आहे. त्यामुळे पेशावरमधील हिंदु कुटुंबे स्वत:चा मान आणि जीव वाचावा, म्हणून पंजाबमध्ये आश्रयार्थ येत आहेत. आपणास भारताचे नागरिकत्व मिळावे, म्हणून ते आवेदन करणार आहेत. फाळणी झाली तेव्हा `भारतात एकही मुसलमान ठेवू नका आणि पाकिस्तानात एकाही हिंदूला मरू देऊ नका. सगळयांना सुखरूप भारतात घेऊन या’, असे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. त्यानुसार मुस्लीमबहुल भागातील सर्व हिंदूंनी `आम्ही येथे राहू कि उर्वरित भारतात येऊ ?’, असा प्रश्‍न गांधी, नेहरू, कृपलानी इत्यादी लहान-मोठ्या सर्व नेत्यांना विचारला होता. त्यावर सर्व कॉँग्रेस नेत्यांनी असे उत्तर दिले होते की, मुसलमानांवर अविश्‍वास दाखवू नका. तेथेच राहा. भारत सरकार लवकरच पाकिस्तानशी करार करणार आहे. त्यानुसार पाकिस्तान सरकार तुमचे रक्षण करील. भोळसट हिंदूंनी काँग्रेस नेत्यांवर विश्‍वास ठेवला. लवकरच त्या सर्वांची कत्तल झाली; परंतु भारत सरकारने त्यांच्या रक्षणासाठी एकही पाऊल उचलले नाही. श्रीप्रकाश महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल. तसे पाकिस्तानातील ते पहिले भारतीय उच्चायुक्‍त. पाकिस्तानात भारतातून स्थलांतरित झालेल्या मुसलमान युवक-युवतींच्या महाविद्यालयीन प्रवेशासाठीसुद्धा श्रीप्रकाश यांना लक्ष घालावे लागे; पण पाकिस्तानात राहिलेल्या हिंदूंवरील अत्याचारांबाबत त्यांना मूकपणे पहात रहाण्यावाचून काही करता येत नव्हते; कारण तशा नेहरूंच्या आज्ञा होत्या. आज तीच परिस्थिती आहे. ज्या दिवशी पेशावरचे हिंदू भारतात पळून आले, त्याच दिवशी जनरल परवेझ मुशर्रफ यांनी भारतास भेट देऊन `काश्मीरचा प्रश्‍न सोडविला नाहीत, तर पुन्हा `कारगिल’ होईल’, अशी धमकी दिली. काँग्रेसचे हात हिंदूंच्या रक्‍ताने लडबडले आहेत; म्हणून ते छाटून टाकले पाहिजेत. – सुघोष

Advertisement

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.